शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरापासून पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

खेट्री: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील वार्ड क्रमांक ४ मधील गत आठवडाभरापासून पाणीपुरवठा ठप्प असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत ...

खेट्री: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील वार्ड क्रमांक ४ मधील गत आठवडाभरापासून पाणीपुरवठा ठप्प असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पिंपळखुटा येथे वार्ड क्रमांक ४ मधील ग्रामस्थांना एका शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा नियमित केला जात होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वार्ड क्रमांक ४ मधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. आठवडाभरापासून ठप्प झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांची समस्या लक्षात घेत, गावातील सामाजिक कार्यकर्ता आरेफ पठाण यांनी पुढाकार घेऊन टँकरद्वारे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरपंच अल्का सुभाष वाहोकार यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे ग्रामस्थांना आशा होती. मात्र, ग्रामस्थांची निराशा झाली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)

प्रतिक्रिया

विद्युत पुरवठा कमी दाबाचा मिळत असल्याने पाणी जलकुंभात पोहोचत नाही. विद्युत पुरवठा कमी दाबाचा मिळत असल्याबाबत महावितरण विभागांना माहिती दिली आहे.

-अल्का सुभाष वाहोकार, सरपंच पिंपळखुटा.

प्रतिक्रिया

वार्ड क्रमांक ४ मध्ये हेतुपुरस्सर ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

- शिवलाल वासुदेव कवळे, ग्रामस्थ, वार्ड क्र. ४ पिंपळखुटा.