शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प!

By admin | Updated: May 26, 2017 02:47 IST

गटविकास अधिकाऱ्यांनी पाठविले टँकरकरिता प्रस्ताव

पद्माकर लांडे। लोकमत न्यूज नेटवर्कवल्लभनगर : अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वल्लभनगर, सांगवी खु., हिंगणा, तामसवाडी, निंभोरा, कासली बु., खु. गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा होत असला, तरी महिनोगणती पिण्याचे पाणीच गावात पोहोचत नसल्यामुळे पाचही गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक २०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असे लोकसुद्धा मोलमजुरी करून पाणी विकत घेत आहेत. कारण पूर्णा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही आणि पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्रोत नाही. येथील गावकरी कुटासा फाट्यावरून ट्रॅक्टरद्वारे पाणी आणत असल्याने एका टाकीला २०० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे येथे पाणी नाही, ही ओरड बहुतांश ग्रामस्थ करीत आहेत. पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अकोला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. तरी अद्यापही या पाच गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडून सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वल्लभनगर खु., हिंगणा, तामसवाडी, निंभोरा, कासली बु., कासली खु. या गावांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत असते. मागील वर्षी पाचही गावांत पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये एक ग्रामपंचायत क्षेत्रात ५० ते ६० हजार रुपयांची रक्कम टँकरवर खर्च करण्यात आली होती. त्यावेळी निंभोरा येथील काही ग्रामस्थांनी भांडणे केल्याने त्यावेळी तेथील ग्रामपंचायतीने चार दिवसांतच टँकर बंद करण्याबाबतचा ठराव अकोला पंचायत समितीकडे रीतसर पाठविला होता.