शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘दररोज पाणीपुरवठा करावा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:14 IST

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी ...

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलावासीयांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १ मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल महाविद्यालयाजवळ रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असून, अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.

अनावश्यक बॅरिकेड हटवा!

अकोला : काेराेनाच्या सबबीखाली पाेलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख चाैकांमध्ये बॅरिकेड उभारले. यामध्ये जय हिंद चाैक, गांधी रोडवर मुख्य चौकात तसेच खदान पाेलीस ठाण्यानजीक बॅरिकेड लावले आहेत. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.

रेल्वे स्टेशन चाैकात अस्वच्छता

अकोला : शहरातील रेल्वे स्टेशन चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला : श्रीवास्तव चाैकातील कामगार कल्याण मंडळासमाेर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

जलवाहिनीवर अवैध नळजोडणी

अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजाेडणी घेऊन त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.