शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

६४ खेड्यांना ‘बोअर’द्वारे करणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:29 IST

अकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुकळी तलावात बोअर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे!दूषित पाण्यावर भागविली जाते तहानग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! 

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.  यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ६४ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातल्या सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्याचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर या प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांकडून केव्हा मान्यता मिळणार आणि टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्षात पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दूषित पाण्यावर भागविली जाते तहान; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्यातील ‘झिर्‍या’च्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महिनाभरापासून ग्रामस्थांना मिळाले नाही पाणी!उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने गत महिनाभरापासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.-उल्हास बंडसहायक भूवैज्ञानिक, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग