शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांचा पाणीपुरवठा, शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा गाजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 03:10 IST

‘बीडीओ’विरुद्ध कारवाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार.

अकोला, दि. १४ : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खांबोराजवळील उन्नई बंधारा ड्राय झाल्याने, ६४ गावांतील बंद झालेला पाणीपुरवठा आणि पातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या परवानगीविना गटविकास अधिकार्‍यांनी आंतरजिल्हा बदलीत एका शिक्षिकेला रुजू करून घेण्याचा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पावसाचे पाणी संपल्याने, ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांमधील ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्हा परिषदेची परवानगी न घेता पातूर पंचायत समिती अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने एका शिक्षिकेला रुजू करून घेण्याचा प्रताप तत्कालीन गटविकास अधिकारी गजानन वेले यांनी केला असून, यासंदर्भात त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारणे नोटीस बजावली आहे. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये १४ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा बंद झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रेणुका दातकर यांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असून, या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा केल्यानंतर पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कोपूलवार यांनी सभेत दिली.