शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कागदावरच!

By admin | Updated: April 20, 2017 01:43 IST

केवळ सहा गावांसाठी सात विहिरींचे अधिग्रहण

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर असला, तरी १९ एप्रिलपर्यंत केवळ सहा गावांसाठी सात विहिरी अधिग्रहण करण्याची उपाययोजना पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत.जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा गत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ३११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या १९८ उपाययोजना कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये २२ विंधन विहिरी, २७ कूपनलिका, ४५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नऊ तात्पुरत्या पूरक नळ योजना, एक टँकरद्वारे पाणीपुरवठा, ९४ विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १९ एप्रिलपर्यंत सहा गावांसाठी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे कागदावरच असल्याची स्थिती आहे.१३ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार, जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये १३ उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे अद्याप रखडली आहेत.१५ विंधन विहिरी, १० कूपनलिकांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे!जिल्ह्यात १५ विंधन विहिरी आणि १० कूपनलिकांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १८ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.