शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे होऊनही पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2017 02:48 IST

बाळापूर तालुक्यात ५२ गावांमध्ये जलयुक्तची झाली कामे

अनंत वानखडे - बाळापूरबाळापूर तालुक्यातील ५२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार योजना सुरू झाली. जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी कामे न झाल्याने योजनेला हरताळ फासून शासकीय योजना कुरण ठरत आहे.जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडित झाल्यास पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी नदी-नाल्यावर अडविलेले पाणी पिकांना पंपाद्वारे देण्यासाठी वापरतात; परंतु ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शिवार योजनेचा कुठलाही लाभ होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या गावातच पाणीटंचाईचे संकट उभे राहत असल्याचे चिन्ह आहे.२०१४-१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत २० गावे २०१५-१६ मध्ये १२ गावे, २०१६-१७ मध्ये २० गावे असे एकूण ५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भूगर्भात पाणी जिरविण्यासाठी पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी नाले शासकीय जमिनीवर शेततळे खोदणे, शेतकऱ्याच्या शेतात ढाळीचे बांध बांधणे, विहीर पुनर्भरण, नाला रुंदीकरण, बंधारे, शेततळ्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवणे आदी कामांसोबत सिमेंट बंधारे बांधणे यासाठी लघुसिंचन जि. प. बांधकाम विभाग, तालुका कृ षी कार्यालय, जलसंधारण विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रशासन करीत आहेत. जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागाची खरी गरज आहे; परंतु लोकसहभाग वाढवण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता प्रशासकीय अधिकारी कुठल्याही कामाला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी न घेता भ्रष्टाचाराला पूरक अशी कामे केली जात आहे. अनेक शेततळी बंधारे कोरडीच राहिली. विहीर पुनर्भरणाच्या नावाखाली कामे झाली; परंतु फायदा झालेला नाही. मोरगाव सादीजनमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची सर्वात जास्त कामे झाली; परंतु तेथे अद्यापही पाणीटंचाई भासत आहे. याबात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे योजनेच्या निकृ ष्ट कामाच्या तक्रारी झाल्या. परंतु चौकशी झाली नसल्याचा आरोप बंडू टेकाडे, खंडूजी लाखे, देवीदास वाघ, हरिभाऊ वाघ यांनी केल्या होत्या. वझेगाव, दधम, शेळद, उरळ खु. लोहारा या गावांतही तीच परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत सर्व कामे यंत्रांनी केली जात असली, तरी खोली, रुंदीकरण कामात निकृ ष्ट दर्जा, प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल काढून भ्रष्टाचाराला पूरक ठरल्याने दोन वर्षांपूर्वीची अनेक ढाळीचे बांध शेततळे, जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचारासाठी पायवाटा काढून निकृ ष्ट दर्जाची कामे प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्षित करून कामात वाटेकरी होत आहेत. जलयुक्त शिवार योजना पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक असली, तरी नियोजनाअभावी, भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून केली नसल्याने योजना भ्रष्टाचाराचे केवळ कुरण ठरणार आहे. खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईतालुका हा खारपाणपट्ट्याने व्यापला आहे. सिंचन क्षेत्र केवळ पाच टक्के आहे. २०१४-१५ मध्ये घेतलेल्या योजनेतील कामामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढ होत आहे.