शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

By admin | Updated: May 28, 2017 03:38 IST

२६ मेपर्यंंत केवळ नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, उर्वरित उपाययोजनांचे एकही काम अद्याप सुरू झाले नाही

संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी २८१ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली, तरी त्यापैकी २६ मेपर्यंंत केवळ नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, उर्वरित उपाययोजनांचे एकही काम अद्याप सुरू झाले नाही. पावसाळा तोंडावर आला असताना, एकही काम सुरू नसल्याने जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी २८१ गावांमध्ये विविध १९८ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा गत मार्चमध्ये मंजूर करण्यात आला. कृती आराखड्यात मंजूर उपाययोजनांच्या कामांपैकी ४२ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कृती आराखड्यात १९८ उपाययोजनांची कामे मंजूर असली, तरी २६ मेपर्यंंत जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणासाठी केवळ नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. उर्वरित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांच्या कामांपैकी एकही काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. तापत्या उन्हासोबतच जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ासह विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे; मात्र पावसाळा तोंडावर आला, तरी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे एकही काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ात यंदा पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ासह पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खर्च केवळ चार लाख!जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात १९८ उपाययोजनांच्या कामांसाठी २५ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे; मात्र आतापर्यंंंत जिल्हय़ात केवळ नऊ विहिरींच्या अधिग्रहण कामासाठी केवळ चार लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.