शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पाणी टंचाईची फळ पिकांना झळ!

By admin | Updated: May 13, 2014 00:13 IST

फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात

अकोला : जिल्ह्यात काटेपूर्णा धरणात पाणी उपलब्ध असले तरी विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात आली आहेत.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. यामुळे यावर्षी शेतकरी निश्चिंत होता; परंतु जमिनीतील पाण्याची हवी तेवढी सरासरी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. पडलेला पाऊस वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या सर्व परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे.जिल्‘ात सर्वाधिक ३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्‍या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षात शेतकर्‍यांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्‍या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. हे क्षेत्र वाढवायचे असेल, तर शेतकर्‍यांना सुविधा, पाण्याची निश्चित हमी हवी आहे. आताच पाण्याची पातळी घसरली आहे. पुढे पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे फळे उत्पादक शेतकरी आतापासूनच चिंतेत आहे.