शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा उद्रेक; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या कॅबिनची तोडफोड

By admin | Updated: March 31, 2017 19:56 IST

पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून बुधवारी प्रभाग क्र.१ च्या महिला व नागरिकांनी मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतीवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा काढला.

पाण्यासाठी महिला, नागरिकांचा मोर्चा; पोलिसांना केले पाचारण हिवखेड : उन्हाळा लागत नाही तोच येथील नगारिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून या पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतीवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा चढविला. या मोर्चादरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांच्या मधातील वाद विकोपाला गेल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड करण्यात आली.हिवरखेड या गावाची लोकसंख्या जवळपास ४० हजार असून गावाला वारी येथील वान धरणातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीकडून मात्र गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. गावातील व अनेक भागात ग्रामपंचायतीकडून सोडलेले पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्यामुळे गावातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षापूर्वी नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी २४ तास चालणारे पाण्याचे सार्वजनिक स्टँडपोस्ट दिले होते. मात्र, काही दिवसापूर्वी हे सार्वजनिक स्टँडपोस्टसुद्धा ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आलेत. यामुळे नागरिकांना आणखीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याची पाणी कर वसुलीदेखील सक्तीने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामपंचायतीकडून मोर्चाचे समाधान न झाल्यामुळे मोर्चात सहभागी नागरिकांनी ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड केली. यामुळे ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी यशस्वीरित्या गावाला पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहेत, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)