शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडली; रिलायन्सला १२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:45 IST

अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होण्यास कारणीभूत ठरलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला प्रशासनाने चांगलाच दणका दिला. जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड त्वरित मनपात भरणा करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीला दिले आहेत. 

ठळक मुद्देकंपनीच्या तोंडचे पाणी पळाले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होण्यास कारणीभूत ठरलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला प्रशासनाने चांगलाच दणका दिला. जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड त्वरित मनपात भरणा करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीला दिले आहेत. शुक्रवारी खडकी परिसरातील श्रद्धानगर येथे कंपनीच्या खोदकामात मनपाची ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे ऐन जलसंकटाच्या परिस्थितीत लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण केले. सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केल्यानंतर मनपाने रिलायन्स कंपनीच्या विरोधात कारवाईचा दांडूका उगारला. ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडणार्‍या कंत्राटदार स्वामी टेलीनेट अँन्ड कन्स्ट्रक्शन कंपनी, धुळे यांना १२ लाखांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि शुद्ध पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे ४ लाख रुपये दंडात्मक रकमेचा समावेश आहे. कंपनीने सदर रकमेचा भरणा करावा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी दिला आहे. 

कंपनीच्या तोंडचे पाणी पळाले!महापालिकेने दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसताच कंपनीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ९00 व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मनपाने दंड आकारला. ही रक्कम कमी व्हावी, यासाठी कंपनीचे काही प्रतिनिधी मनपाकडे ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती आहे.