शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील धरणातील पाणी पिण्यासाठी होणार आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:42 IST

अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.

ठळक मुद्देखडकपूर्णा, दगडपारवा धरणात शून्य टक्के साठा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.पावसाळा संपत आला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ) धरणांतील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सातत्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली असली तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्याच्या आतच होती. यावर्षी पावसाने दडी मारली आहे. ११ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात १६.८४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.५३, निर्गुणा ३७.३0, उमा धरणात तर 0.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या  ६७.९९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात १४.९८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ७.१0 टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २0.९३, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १0.७८, पलढग ४0.७५, मन ९.३७, तोरणा ६.४६ टक्के, तर उतावळी धरणात १८.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २९.0६ टक्के, सोनल १.९८ टक्के, तर एकबुर्जी धरणात १५.८७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागात ३३.४८ टक्के जलसाठा!अमरावती विभाग म्हणजेच वर्‍हाडातील एकूण मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ ३३.४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, सर्वाधिक कमी जलसाठा बुलडाणा जिल्हय़ात ११.८0 टक्के आहे. वाशिम जिल्हय़ात १९.८२ टक्के, अकोला २८.६६ टक्के, यवतमाळ जिल्हय़ात ३२.११ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ५५.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.

सध्याची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता यापुढे धरणातील पाण्याचे आरक्षण केवळ पिण्यासाठीच राहील. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. पावसाळा अद्याप संपला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.