शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटली; पाण्याची नासाडी

By admin | Updated: March 6, 2017 02:00 IST

वरूर-जऊळका परिसरातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

वरुर जऊळका (जि. अकोला), दि. ५- पुलाचे बांधकाम करीत असताना जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याने हजारो गॅलन पाण्याची नासाडी होत आहे. चार दिवसांपासून पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने वरुर जऊळका व परिसरातील लोतखेड, खापरवाडी, कालवाडी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून पिण्यासाठी पाणी म्हणून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे; मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्षच असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.वरुर जऊळका येथील पठार नदीवर मोठा पूल बांधण्याचे काम नुकतेच सुरू झाले असून या नदीलगतच किनार्‍यावर जीवन प्राधिकरण विभागाची जलवाहिनी गेलेली आहे. पुलाच्या कामासाठी जेसीबीद्वारे काम सुरू असून या जेसीबीने सदर जलवाहिनी फुटल्याने हजारो गॅलन पाणी वाया गेले आहे. यामुळे ग्रामस्थांना गोड पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सदर जलवाहिनी फुटलेली असून जलवाहिनी अद्याप जोडलेली नाही. पिण्याकरिता पाणी हवे म्हणून नागरिक विहिरीचा सहारा घेत आहेत. तर या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे पाणी पिणेसुद्धा अवघड झालेले आहे. सकाळपासून मजुरीचे काम दूर ठेवून मजूर वर्गाला आधी पाण्यासाठी विहिरीचा आधार घ्यावा लागतो. विहिरीवर नियमितच मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहावयाला मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला असून लग्नाचा मोसमसुद्ध सुरू झाला आहे.अकोला जि.प.चे अध्यक्ष यांचा हा मतदारसंघ आहे. अकोट पं.स. उपसभापतीसुद्धा स्थानिक गावचे आहेत. यांनी सदर भाग खारपाणपट्टय़ाचा असल्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे; मात्र अधिकारी वर्गाचे याकडे दुर्लक्ष दिसून आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.