शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जलवाहिन्यांना गळती

By admin | Updated: August 15, 2014 01:41 IST

अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणात केवळ २0 टक्के जलसाठा

अकोला-निम्मा पावसाळा उलटून गेला असून अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणातील जलसाठय़ात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. आजमितीस धरणात केवळ २0 टक्के जलसाठा उपलब्ध असताना शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिन्या, अंतर्गत जलवाहिन्यांसह व्हॉल्वमधून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ह्यलिकेजह्णच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असले तरी नागरिकांना पाणी बचतीचे मुलमंत्र देणार्‍या खुद्द महापालिका प्रशासनाला मात्र स्वत:च्या कर्तव्याचा पुरेपुर विसर पडल्याचे चित्र आहे. प्रशासनाने जलवाहिन्यांच्या गळत्यांवर त्वरीत उपाययोजना न केल्यास, पाणीटंचाईच्या समस्येत अधिकच भर पडणार,हे निश्‍चीत मानल्या जात आहे.मनपातील जलप्रदाय विभागाच्यावतीने महान धरणातून अकोलेकरांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसामुळे धरणातील जलसाठय़ात १00 टक्के वाढ झाली होती. यंदा मात्र निम्मा पावसाळा उलटून गेला असून पावसाअभावी धरणातील जलाशयात किंचीतही वाढ झाली नाही. आजरोजी धरणातील पाण्यावरील औद्योगिक व सिंचनाचे आरक्षण हटविण्यात आले असले तरी उपलब्ध २0 टक्के जलसाठा लक्षात घेता, ही अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. मध्यंतरी शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची सबब पुढे करीत मनपा प्रशासनाने पाच दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले. महिन्यातून अकोलेकरांना सहा दिवस पाणीपुरवठा होत असताना त्यामध्ये आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे अकोलेकरांना पाण्याच्या बचतीचे मुलमंत्र सांगितल्या जात असतानाच दूसरीकडे मुख्य जलवाहिन्यांसह अंतर्गत जलवाहिन्यांना गळत्या लागल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागात रस्त्यावर पाण्याचे लोट पसरल्याचे चित्र असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यावर प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. पाईपलाईनचा सर्व्हे अधांतरीशहरातील जलवाहिन्या दुरुस्तीची कामे नगरसेवकांच्या अखत्यारित असलेल्या खासगी कंत्राटदारांमार्फत केल्या जातात. मात्र पाईप लाईन दुरुस्तीचा दर्जाच नसल्याने वारंवार गळत्या लागतात. उन्हाळय़ात पाणीपुरवठय़ाच्या नियोजनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते; परंतु जलवाहिन्यांना सर्वाधिक गळती उन्हाळय़ातच लागत असल्याचे दिसून येते. जमिनीच्या खाली दर्जाहिन पाईप वापरून पुन्हा त्याच पाईप लाईनची कामे प्रस्तावित करण्याची प्रथा गत बारा वर्षांपासून सुरू आहे. यावर सत्तापक्ष भारिप-बमसंच्यावतीने ऑक्टोबर २0१३ मध्ये पाईप लाईनचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. हा सर्व्हे अद्यापही अधांतरी असल्यामुळे खिसे भरणार्‍यांचे चांगलेच फावत आहे.