शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७५ एकर जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

By admin | Updated: July 13, 2017 01:06 IST

पारस प्रकल्प : विस्तारीकरणाला ब्रेक लागल्याने शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पारस औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने गावातील शेतकऱ्यांची ११०.९२ हेक्टर (२७५ एकर) जमीन संपादित केल्यानंतर आता शासनाने वीज निर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीपासून हात वर केले आहेत. शेतकऱ्यांचा आधीच विरोध असताना जमीन संपादित झाली आहे. ती परत करण्याची मागणी आता शेतकरी करणार आहेत. पारस वीज निर्मिती केंद्राच्या विस्तारासाठी २००७ मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. वीज निर्मिती कंपनीच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आधी प्रकल्पासाठी १३२.७० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी प्रस्तावातून २१.७८ हेक्टर जमीन कमी करून ११०.९२ हेक्टरचे संपादन करण्याला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी वीज निर्मिती कंपनीने महसूल विभागाला १ कोटी ८ लाख रुपये अदाही केले. त्यानंतर जमिनीच्या मोबदल्यासाठी ८ कोटी ५७ लाख ५१ हजार रुपये भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा केले. त्यानुसार जमीन संपादनाचा अंतिम निवाडा १६ जून २०११ रोजी करण्यात आला. त्यानंतर काही शेतकऱ्यांची प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाने सार्वजनिक हितासाठी जमीन संपादनाचे आदेश दिले. त्यानुसार संपूर्ण जमिनीचे संपादन झाले. आता मात्र राज्याला विजेची गरज नसल्याचे सांगत पारस प्रकल्पाचे विस्तारीकरण न करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी स्पष्ट केले.त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आता पारस औष्णिक विद्युत प्रकल्प संघर्ष समितीची स्थापना करून जनआंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचे शासनाला सवाल- भौतिक सुविधा उपलब्ध नसताना परळी, कोराडी येथे नवीन संच उभारणी केली, आम्हाला गाजर का?- नवीन संच उभारणीसाठी संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा.- धरणातील पाणी सिंचनासाठी उपसा करण्याच्या परवानग्या देऊन विद्युत जोडण्या द्या. - प्रकल्पग्रस्तांनाही झुलवण्याचे काम होत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.