शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

१0५ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा सुरू!

By admin | Updated: April 9, 2017 01:20 IST

तीन तालुक्यांतील ६७ गावांमध्ये श्रमदान; जिल्हाधिका-यांनी दोन तास श्रमदान करून केले उद्घाटन.

अकोला : पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतूने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत वॉटर कप राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील १0५ गावे सहभागी झाली आहेत. यापैकी ६७ गावांमध्ये पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात येऊन विविध प्रकारची कामे करण्यात आली. प्रत्येक गावात पाणलोट व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. पाणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना अमरावती जिल्ह्यातील पोरगव्हाण येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपापल्या गावांमध्ये मोहिमेचे काम सुरूसुद्धा केले आहे. प्रशिक्षित व्यक्ती पावसाचे पाणी साठविण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यासाठी काय करण्याची गरज आहे, हे पटवून देत आहेत. या मोहिमेच्या दुसर्‍या सत्राचा कालावधी ८ एप्रिल २0१७ ते २३ मे २0१७ असा आहे.पातूर तालुक्यातील ३५ गावांनी सहभाग घेतला आहे. यापैकी २0 गावांमध्ये पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. शिर्ला गावात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आमदार बळीराम सिरस्कार आदींनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्पर्धेचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, शिर्ला येथे युवकांनी रात्री १२ वाजून १ मिनिटाने श्रमदानास प्रारंभ केला. पातूर तालुक्यातील चारमोळी येथील ८00 ग्रामस्थांनी एकाच वेळी तर अंधारसांगवी येथे ३५, मळसूर येथे ३५, सुकळी ३५, जांभरुण येथे ५0, बेलुरा बु. येथे २५ ग्रामस्थांनी श्रमदान केले. यामध्ये विविध कामे करण्यात आली.