शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तर ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना लागणार ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:00 IST

जलयुक्त शिवार कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या १ हजार ७५६ कामांपैकी १ हजार १२९ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६२७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. जलयुक्त शिवार कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या ६२७ कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ७५६ कामे प्रस्तावित करण्यात आली.एकूण ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी गत मे महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात १ हजार १२९ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती व नूतनीकरण, जुन्या जलस्रोतातील गाळ काढणे,जलस्रोतांचे बळकटीकरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, विहिरींचे पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर इत्यादी कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर कामांपैकी ६२७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांचा निधी थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास, जिल्ह्यातील प्रलंबित जलयुक्त शिवारची ६२७ कामे थांबणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार