शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संवर्धनच तारणार - शेळके

By admin | Updated: July 9, 2017 09:29 IST

इंडियन वॉटर असोसिएशनची अकोल्यात स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी बहुमोल असून, पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. भविष्यात येणार्‍या पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागणार आहे, अन्यथा पाण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरू ण शेळके यांनी शनिवारी येथे केले.अकोल्यात इंडियन वॉटर वर्क (आयवा)असोसिएशनची ३३ वी शाखा स्थापन करण्यात आली. त्यानिमित्त बाभूळगाव येथील श्री.शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरू न बोलत होते. कार्यक्रमाला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आयवाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक संचालक डॉ. हेमंत लांडगे, श्री. शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.बॅनर्जी, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके अकोला, अजय मालोकार आदींची उपस्थिती होती. अँड. शेळके यांनी पाण्याचे महत्त्व समजावून सांगताना, इंडियन वॉटर वर्क असोसिएशनची अकोला येथे शाखा स्थापन झाल्याने, या भागातील जनतेला पाण्यासंबंधी या संस्थेला लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तद्वतच या संस्थेच्या अभियंत्यांनी नवे संशोधन करू न नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच तंत्रज्ञान समजावून सांगावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. डॉ. गुप्ता यांनीही पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ.लांडगे यांनी शाश्‍वत पाण्याच्या स्रोतावर विचार मांडले. भविष्यातील पिढीची गरज ओळखून आतापासूनच आपण पाण्याचा काटेकोर वापर करणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. ५0 वर्षे आधी नदी, नाले तुडुंब भरलेले असायचे. बारमाही पाण्याची उपलब्धता होती. आज त्याच नदी, नाल्यांची गटारे झाली आहेत. हाच वारसा आजच्या आपल्या पिढीपुढे आहे. आपणही तोच वारसा भविष्यात ठेवायचा का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, येथे पाणी या विषयावर उपस्थित तज्ज्ञांनी पडद्यावर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व इतर राज्यातील तज्ज्ञांची उपस्थिती होती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.