शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट आणखी भीषण!

By admin | Updated: April 29, 2016 02:06 IST

अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील केवळ ४.८९ दलघमी जलसाठा.

राजरत्न सिरसाट /अकोलाअकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात मागील वर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने, यावर्षी एप्रिल महिन्यातच या धरणातील जलसाठय़ाने तळ गाठला. यामुळे अकोलेकरांवरील जलसंकट वाढले आहे. काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक असून, यावर्षी याच धरणातून दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा १५ जूनपर्यंत अकोलेकरांची तहान भागवणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी उन्हाळा प्रखर असून, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग दररोज १२ ते १५ मि.मी. एवढा आहे. ग्रामीण भागातील जनतेची पाण्याविना होणारी होरपळ बघता, जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा- उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा १८ किलोमीटरचा प्रवास असून, ४३ ते ४५ अंश तापमानामुळे नदीपात्र कोरडेठण्ण पडल्याने पात्रातच मोठय़ा प्रमाणात पाणी मुरत आहे.परिणामी गुरुवारी सांयकाळपर्यंत २४ तास उलटूनही केवळ अर्धे म्हणजे नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच पाणी पोहोचले होते. हे पाणी पुढे येण्यासाठी आणखी २४ ते ३0 तास लागण्याची शक्यता आहे. या पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी धरणातून आणखी एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास काटेपूर्णात केवळ ३.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असेल. अकोलेकरांना दररोज लागणार्‍या पाण्याची गरज बघता, या साठय़ात १५ जूनपर्यंत त्यांची तहान भागवणे अशक्य आहे.