शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचा ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:49 IST

अकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक्ष (वॉच) राहणार आहे.

ठळक मुद्दे७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक्ष (वॉच) राहणार आहे.अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील ११ झोनमध्ये  महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, अन्न-धान्य वितरण अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पी.यू. गिरी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व तलाठी इत्यादी संवर्गातील ६५ अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे गणेश विसर्जन मिरवणुकीवर नियंत्रण राहणार असून, संपूर्ण मिरवणूक मार्गावर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांचे नियंत्रण राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या नियंत्रणात कक्ष कार्यान्वित राहणार आहे.

रंगरंगोटी कशासाठी?निमवाडी परिसरात नदीपात्र दूषित झाले आहे. तरी सुद्धा याठिकाणी पायर्‍यांची रंगरंगोटी करण्यात आली. नदीपात्रात घातक रसायन असून, पाण्यात उतरणेही आरोग्यासाठी घातक आहे. अशावेळी भक्तिभावात दंग होणार्‍या गणेश भक्तांनी दूषित पाण्यात गणेश विसर्जन करायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

चार ठिकाणं संवेदनशीलगणेश विसर्जन मिरवणुकीत ५0 मंडळं सहभागी होण्याची शक्यता आहे. मिरवणूक मार्गावरील चार ठिकाणं संवेदनशील आहेत. यामध्ये जामा मस्जीद (अलका बॅटरी), माळीपुरा चौक, जामा मस्जीद (तेलीपुरा चौक) व कच्छी मस्जीद (ताजना पेठ) या ठिकाणांचा समावेश आहे.