शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रेल देखो, बस देखो आंदोलन!

By admin | Updated: August 10, 2014 20:57 IST

जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ‘रेल देखो, बस देखो’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

अकोला: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान 'रेल देखो, बस देखो' हे अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी प्रवाशांना विदर्भ बंधन धागा बांधून, वेगळ्या विदर्भाची मागणी असलेली टोपी घालण्यात आली. सकाळी ११ वाजता बसस्थानक परिसरातील ब्रिजलाल बियाणी यांच्या पुतळ्याजवळ जनमंच व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा झाले होते. पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्थानक तसेच बसस्थानकावर प्रवाशांना १0 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे विदर्भ बंधन धागा बांधण्यात आला. तसेच टोपी घालण्यात आली. प्रवाशांना वेगळ्या विदर्भाची गरज का आहे? याची माहिती देण्यात आली. विदर्भ बंधन धागा बांधून नागरिकांना विदर्भाशी त्यांचे असलेले नाते घट्ट करण्यात आले. यावेळी गणेश पोटे, धनंजय मिश्रा, कृष्णा अंधारे, रामेश्‍वर बरगट, जयंत सरदेशपांडे, गणेश उदापुरे, इमरान खान, फिरोज खान, एहजाज खान, सलीम शाह, विनोद गुप्ता, गोपाल देशमुख यांच्यासह जनमंच व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी तीन महिन्यांनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. निवडणुकीच्या काळात अनेक चमत्कार घडतात. त्यामुळे आंदोलनाची हीच योग्य वेळ असल्याने वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन तीव्र झाले. त्यामुळे पुढील तीन महिन्यात क्रियाशील राहून वेगळ्या विदर्भाची चळवळ जोमात चालविण्यात येणार आहे.