शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या वाहनांवर ‘जीपीएस’प्रणालीद्वारे ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:14 IST

अकोला: महापालिक ा प्रशासनाच्यावतीने वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देनव्याने निविदा बोलावण्यात आली असून, पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. मनपातील २०५ वाहनांवर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून, यामुळे इंधनाच्या गैरवापराला चाप बसणार आहे.संबंधित वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला: महापालिक ा प्रशासनाच्यावतीने वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. स्थायी समितीच्या सूचनेनुसार नव्याने निविदा बोलावण्यात आली असून, पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत मनपातील २०५ वाहनांवर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून, यामुळे इंधनाच्या गैरवापराला चाप बसणार आहे.अकोलेकरांनी घरातील, दुकानांमधील कचरा सर्व्हिस लाइनमध्ये किंवा रस्त्यावर न फेकता मनपाच्या वाहनात जमा केल्यास सार्वजनिक ठिकाणी साचणाºया कचºयाची समस्या राहणार नाही, या उद्देशातून मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ८१ व दुसºया टप्प्यात ४४ नवीन वाहनांची खरेदी केली. या वाहनांसाठी प्रशासनाने स्वयंरोजगार तत्त्वावर खासगी चालकांची नियुक्ती केली. मोटारवाहन विभागाकडून वाहनांसाठी दररोज ६ ते १० लीटर डीझल दिले जाते. प्रभागांचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक भागासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये नवीन प्रभागांचा समावेश असून, वाहनचालकांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखल्या जाते. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याच्या बदल्यात ३० रुपये आणि दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांना प्रति महिना ५० ते २०० रुपये शुल्क आकारल्या जाते. प्रभागातून कचरा जमा करून डम्पिंग ग्राउंडवर टाकल्यानंतर घंटागाडी चालक वाहनाचा मनमानीरीत्या वापर करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्या पृष्ठभूमीवर घंटा गाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय होऊन निविदा राबवण्यात आली. स्थायी समितीने दोन वेळा प्रशासनाची निविदा नामंजूर करत, फेरनिविदा राबवण्याचे निर्देश दिले होते. मध्यंतरी प्रशासनाने फेरनिविदा प्रक्रिया राबवली असता पाच कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले. कमी दरासोबत शासनाचे निकष पूर्ण करणाºया कंपनीला प्राधान्य दिले जाणार आहे.दुकानदारीला आळा बसेल?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचºयाची साठवणूक अपेक्षित असताना काही वाहनचालक शहराच्या कानाकोपºयात किंवा राष्ट्रीय महामार्गालगत जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून मोकळे होतात. तसेच सकाळी प्रभागातील कचरा जमा केल्यानंतर दुपारी काही वाहनचालक वाहनांचा खासगी कामासाठी वापर करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यामुळे संबंधित वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०५ वाहनांवर प्रणालीमनपाकडे १२१ घंटागाड्या असून, मालकीचे १६ ट्रॅक्टर तसेच भाड्याचे ३३ ट्रॅक्टर कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त जेसीबी, टिप्पर तसेच अधिकारी-पदाधिकाऱ्यांसाठी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. अशा सर्व २०५ वाहनांवर ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. यामुळे दांडीबहाद्दर वाहनचालकांना लगाम बसण्याची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका