शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारमधील सांडपाण्याचे होणार शुद्धीकरण!

By admin | Updated: September 30, 2015 02:06 IST

शुद्ध केलेले सांडपाणी कारागृहाला देणार.

नितीन गव्हाळे / अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये मोठय़ा प्रमाणात बाहेर पडणार्‍या सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, परिसरातील भूमिगत गटार योजनेचे ६0 टक्के काम पूर्ण झाले आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाने शासनाकडे मागितली आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या कामास सुरुवात होईल. शुद्ध केलेले सांडपाणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहास वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. पश्‍चिम विदर्भाचे ट्रामाकेअर सेंटर म्हणून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहिले जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी व निवासी प्राध्यापकांची निवासस्थाने, रुग्णालय व त्यातील विभागातील दररोज हजारो लीटर सांडपाणी शहराबाहेर सोडल्या जाते. शहरातील मोर्णा नदीपर्यंत हे सांडपाणी सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. सांडपाण्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढू नये, या दृष्टिकोनातून सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने महाविद्यालय प्रशासनाने काही महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. परिसरात भूमिगत गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. भूमिगत गटार योजनेचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शासनाची परवानगी मागितली आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसविण्यात येईल. येथील शुद्धीकरण केलेले सांडपाणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहास देण्यात येणार आहे. कारागृहाकडे स्वत:ची शेतजमीन असल्याने, शेतीसाठी हे पाणी उपयोगात आणण्यात येईल. तसेच कारागृहातील भाजीपाला व फुलशेतीलासुद्धा या पाण्याचा पुरवठा करता येईल.