शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावर प्रक्रिया; मुंबईच्या कंपनीसोबत चर्चा

By admin | Updated: April 21, 2017 02:04 IST

कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी अंमलबजावणीची गरज

अकोला : शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहराचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणे नितांत गरजेचे झाले असून, यासंदर्भात मुंबई येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेला कचरा, घाण नायगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर साठवला जातो. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने अकोलेकरांसह महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सद्यस्थितीत नायगावातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे हाच मनपासमोर एकमेव उपाय शिल्लक आहे.त्या पृष्ठभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपात येऊन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. त्यावेळी कचऱ्याच्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. अतिक्रमण कधी हटवणार?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. दिवसेंदिवस ही जागा अतिक्रमकांच्या ताब्यात जात असल्याने संबंधितांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून संबंधित अतिक्रमक मनपाच्या घंटागाडीवरील वाहनचालकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करीत असल्याचे समोर येते. तरीदेखील अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.--