शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरसेवकांच्या लढतीने प्रभाग १२ झाला प्रतिष्ठेचा

By admin | Updated: February 7, 2017 03:21 IST

तीन मुरब्बी नगरसेवक रिंगणात; राजकीय पक्षांचे विशेष लक्ष

अकोला, दि. ६- मदन भरगड, उषा विरक, हरीश आलिमचंदानी या तीन मुरब्बी आणि अजय शर्मा, राजेश्‍वरी शर्मा या दोन युवा नगरसेवकांच्या लढतीने अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १२ सर्वंंच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. या प्रभागातील चारही प्रवर्गात वेगवेगळ्य़ा पक्षांचे उमेदवार वजनदार ठरत असल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष येथे केंद्रित झाले आहे. अकोला महापालिकेत सलग तिसर्‍यांदा निवडून आलेले नगरसेवक रिंगणात असलेला हा प्रभाग आहे. तिघांच्याही कामाची छाप मतदारांवर आणि महापालिकेवर आहे. त्यात दोन युवा नगरसेवक याच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. पाच विद्यमान नगरसेवक आणि ११ नवीन चेहरे निवडणूक मैदानात उतरलेले आहेत. पाच नगरसेवक लढतीत असलेला एकमेव प्रभाग महापालिकेत एकच असल्याने सर्वच पक्षांच्या दृष्टीने हा प्रभाग प्रतिष्ठेचा झाला आहे.खुला पुरुष प्रवर्गात काँग्रेसचे ज्येष्ठ आणि भाजपचे युवा नगरसेवक थेट अमोरा- समोर आहेत. महिला प्रवर्गात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आणि शिवसेनेच्या तरूण नगरसेविका थेट अमोरा-समोर लढत देणार आहेत. त्यामुळे कोणत्याही दोन नगरसेवकांना लढतीत पराभव पत्करावा लागणार आहे, तसेच ज्या नगरसेवकाने मागे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, ते उमेदवार यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मागिल निवडणुकीत ज्या महिला उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर होत्या, त्या यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर काँग्रेसच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. भाजपच्या तिकिटावर ज्यांनी मागे विजयापर्यंंत धाव घेतली होती, त्या उमेदवारही या भाऊगर्दीत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक लक्षवेधी झाली आहे. या प्रभागातून निवडून येणारे दोन दिग्गज नगरसेवक महापौरपदाचे दावेदारही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा जोर या प्रभागात लागणार आहे.या प्रभागात इराणी वसाहत, मंगलवारा आणि बसस्टॅण्ड मागील आंबेडकर नगरातील वसाहतीचे गठ्ठा मत कोणाच्या पक्षांकडे झुकतात, त्यावर या प्रभागातील विजयाचे चित्र अवलंबून आहे.