शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १५ : भाजप, सेना, राष्ट्रवादीत तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 22:40 IST

या प्रभागात भारिप बहुजन महासंघाने चार पैकी एकाही जागेसाठी एकही उमेदवार दिला नसून काँग्रेसने केवळ दोन जागांवर उमेदवार दिले आहेत.

अकोला, दि. १५- प्रभागांची पुनर्रचना होऊन एकत्र आलेल्या गोरक्षण रोड परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. या प्रभागात भारिप बहुजन महासंघाने चार पैकी एकाही जागेसाठी एकही उमेदवार दिला नसून काँग्रेसने केवळ दोन जागांवर उमेदवार दिले आहेत.विद्यमान नगरसेवक बाळ टाले, भाजप व कल्पना गावंडे यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रभाग क्र. ३१ आणि गोपी ठाकरे व करुणा इंगळे यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रभाग क्र. ३२ मधील बहुतांश भागाचा समावेश नव्या प्रभाग क्र. १५ मध्ये आहे. या भागावर भाजपची मजबूत पकड असल्यामुळे विरोधी पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. मनपा निवडणुकीच्या रिंगणात या प्रभागातून ह्यअह्ण प्रवर्गासाठी भाजपच्यावतीने शारदा रणजित खेडकर, शिवसेनेच्या सावित्री झांबरे, राष्ट्रवादीकडून कल्पना गावंडे, तसेच अपक्ष उमेदवार मुस्कान पंजवाणी निवडणूक लढवत आहेत. ह्यबह्ण प्रवर्गात भाजपच्या मनीषा रवींद्र भन्साली, शिवसेनेच्या महेक सबलानी, राकाँच्या भाग्यश्री झटाले, मनसेच्या उषा साबळे, काँग्रेसच्या अपर्णा अरुण गावंडे व अपक्ष मीना चौधरी उभ्या आहेत. ह्यकह्ण प्रवर्गातून भाजपचे बाळ टाले यांचा सामना शिवसेनेच्या लक्ष्मण पंजाबी, मनसेचे पंकज साबळे व राकाँचे अनुज तापडिया यांच्यासोबत होईल. ह्यडह्ण प्रवर्गात भाजपचे दीप मनवानी यांची लढत शिवसेनेचे योगेश अग्रवाल, काँग्रेसचे सचिन लटुरिया व राकाँचे निशिकांत बडगे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले व अपक्ष गोपी ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार पाहता या ठिकाणी ह्यडह्ण प्रवर्गात अपक्ष उमेदवारांकडून कडवे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आव्हान उभे केले जाण्याची चिन्हं आहेत.