अकोला: रेल्वे स्टेशन परिसरातील एका वारांगनेने जीआरपीमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यास क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकारामुळे पोलिसांची नामुष्की होत असल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. जीआरपीमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास याच परिसरातील वारांगनेने मारहाण केली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली. सदर पोलीस कर्मचारी मात्र या वारांगनेची मारहाण निमूटपणे सहन करीत तेथून निघून गेला. हा वाद कोणत्या कारणावरून झाला, याची माहिती मिळाली नाही; मात्र घटनेची पोलीस दलात चांगलीच चर्चा सुरू झाली होती.
वारांगनेकडून पोलीस कर्मचा-यास मारहाण
By admin | Updated: March 8, 2016 02:50 IST