शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉलची जागा पाहिजे,मोबदला द्या!

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

पाटबंधारे विभागाचे मनपाला पत्र.

अकोला: जुने शहराच्या विकासाला चालना देणार्‍या कॅनॉल रस्त्याचे काम प्रशासनाच्या लालफितशाहीत अडकण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.रस्त्यासाठी कॅनॉलची जमिन हवी असल्यास महापालिकेने सरकारी दरानुसार पैसे जमा करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मनपाला पाठवले आहे. या पत्रावर मनपा काय निर्णय घेते,याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.जुने शहरातील डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते नवीन किराणा मार्केटपर्यंंतच्या कॅनॉल रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांंपासून रखडले आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली कॅनॉलची जागा ताब्यात घेऊन मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंंत डांबरी रस्त्याचे निर्माण केले होते. त्यानंतर मात्र रस्ता रुंदीकरणाला घरघर लागली. सुमारे १२0 फूट रुंद असलेल्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रमाणात अतिक्रमण करून पक्की घरे उभारली आहेत. दरम्यान, मनपाने २0१४ मध्ये कॅनॉल रस्त्याची निविदा मंजूर केली; मात्र काम सुरू होऊ शकले नाही. किमान ३५ ते ४0 फूट रुंदीचा रस्ता झाल्यास जुने शहरातील सर्व वाहतूक शहराबाहेरून निघण्यास मदत होईल. यामुळे डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, भीमनगर चौक, काळा मारुती रोड, जय हिंद चौक आदी भागांतील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. कॅनॉल रस्त्यामुळे जुने शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रशासनाला पुरेपूर जाणीव आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मध्यतरी पहिल्यांदाच संयुक्तरित्या डाबकी रोडपासून ते जुना बाळापूर रोडपर्यंंत कॅनॉल रस्त्याची पाहणी केली होती. डाबकी रोड ते संत गोरोबा मंदिरपर्यंंत रस्ता कसा?डाबकी रोड पासून ते कॅनॉल लगतच्या संत गोरोबा मंदिरपर्यंंत यापूर्वीच डांबरी रस्ता तयार आहे. ही जमिन सुध्दा पाटबंधारे विभागाची आहे. असे असताना नव्या प्रस्तावित रस्त्याला पाटबंधारे विभागाकडून निकष लावल्या जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.