शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा!

By admin | Updated: May 27, 2017 00:42 IST

शिक्षण विभागाची तयारी: अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मात्र खडतर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावीची यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली असून, त्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालक जरग यांना परवानगी मागितली आहे; परंतु शिक्षण संचालकांनी अद्यापपर्यंत अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग खडतर असल्याची चिन्हे दिसत आहेत. अमरावती शहराप्रमाणेच अकोला शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सकारात्मक आहे. अभाविप, एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनीसुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याची मागणी केली होती. कनिष्ठ महाविद्यालयांकडून होणारी विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक या प्रवेश पद्धतीने थांबविण्यासाठी शिक्षण विभागानेसुद्धा यासाठी पुढाकार घेतला. शिक्षण उपसंचालकांनी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने घेण्यासंदर्भात परवानगी दिल्यानंतर शिक्षण विभागाने शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा प्रथमच केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नियोजन सुरू केले. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठकसुद्धा शिक्षण विभागाने घेतली. त्यानंतर शिक्षण संचालक जरग यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. आता शिक्षण संचालकांच्या परवानगीची शिक्षण विभागाला प्रतीक्षा लागून आहे; परंतु शिक्षण संचालक जरग यांनी परवानगी दिली नाही, तर यंदाची केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश रखडू शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत. विद्यार्थी संघटना, पालकांनी पुढाकार घ्यावा४यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरातील महाविद्यालयांमध्ये राबविण्याची शक्यता धूसर आहे. कनिष्ठ महाविद्यालये व शिकवणी वर्गांच्या खाबूगिरीला आवर घालण्यासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने झालीच पाहिजे. यासाठी विद्यार्थी संघटनांसोबतच पालकांनी पुढाकार घ्यावा आणि शिक्षण संचालकांना परवानगी देण्यासाठी बाध्य करावे, अन्यथा अकोल्यातील विद्यार्थी केंद्रीय पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील.केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला नाही. दहावीचे निकाल काही दिवसांमध्ये जाहीर होतील, त्यामुळे यंदा परवानगी देणे अशक्य आहे; परंतु शिक्षण उपसंचालकांकडून हा विषय आपल्याकडे आल्यास आणि गरज असल्यास आपण परवानगीसाठी विचार करू. - नामदेव जरग, शिक्षण संचालक.केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. शुक्रवारी शिक्षण संचालक अमरावतीत येत आहेत. येथे शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शनात त्यांच्यासोबत अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा करून त्यांच्याकडे अकोल्यात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी विनंती करू. - प्रकाश मुकुंद