शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: March 4, 2017 02:42 IST

बाजार समिती आवारात ७८0 ट्रॉली उभ्या; तूर खरेदीस सुरुवात

अकोला, दि. ३- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांनी गर्दी केली आहे. शुक्रवारपर्यंत नाफेडच्या केंद्रावर २१ हजारापेक्षा जास्त क्विंटल तूर आली असून, शेतकर्‍यांना मापाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी ५0 ते ५५ ट्रॉलीतील तुरीचे माप करण्यात आले. अडत्यांकडून तुरीला क्विंटलमागे ४२00 ते ४५00 रुपये दर मिळत आहेत, तर नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकर्‍यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. त्यात शासकीय तूर खरेदी केंद्र बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने, जिल्हय़ातील तूर उत्पादक शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली. नाफेडकडे बारदान्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे माप केलेली तूर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु आता बारदान्याची समस्यासुद्धा निकाली निघाली आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या आवारातील दोन्ही बाजूला ७८0 ट्रॉली उभ्या आहेत. एकाच वेळी तूर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केल्यामुळे बाजार समिती आणि नाफेडच्या अधिकार्‍यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तुरीचे माप लवकरच व्हावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा आपले कर्मचारी व साधने नाफेडच्या मदतीला दिले आहेत. केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांचे माप लवकर व्हावे, यासाठी हमाल, माथाडी कामगारांची संख्यासुद्धा वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत पाच ते सहा ठिकाणी तुरीचे माप होत होते; परंतु आता गुरुवारपासून दहा ते बारा ठिकाणावर तुरीचे माप करण्याची व्यवस्था करण्यात आली. गत आठ दिवसांपासून जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून आहे. तुरीचे माप करण्यासाठी बाजार समितीकडून शेतकर्‍यांना टोकन क्रमांक दिले आहेत. टोकन क्रमांकानुसार शेतकर्‍यांच्या तुरीचे माप करण्यात येत आहे. तुरीला ५0५0 रुपये एवढा हमीभाव मिळत असल्याने, शेतकरी नाफेडवरच तूर खरेदीसाठी आणत आहेत. त्यासाठी शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी राहत आहेत. क्वचितच शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडे तूर विकत आहेत. ढगाळ वातावरणाचा अंदाजयेत्या काही दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समिती आवारात पडून असलेल्या मालाचे नुकसान होऊ नये. यादृष्टिकोनातून शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि माल झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. नाफेडच्या रकमेसाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षातूर खरेदीसाठी नाफेड केंद्राला शेतकरी प्राधान्य देत आहेत. अडत्यांप्रमाणे शेतकर्‍यांना रोख रक्कम मिळत नाही. नाफेडच्या रकमेसाठी शेतकर्‍यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे आठ ते दहा दिवसांमध्ये रक्कम जमा होते.