शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थीना अनुदानाची प्रतिक्षा 

By admin | Updated: February 13, 2017 16:48 IST

पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.

जिल्ह्यातील वास्तव: पाचशेच्यावर लाभार्थी वंचितवाशिम: जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी मंजूर झालेल्या ६ हजार ६१९ घरकूलांचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार ६१९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. पात्र लाभार्थीनी या घरकुलांचे कामही सुरू केले आणि अनेक लाभार्थीनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण केले; परंतु यातील अनेक लाभार्थींना पुढील काम करण्यासाठी नियमानुसार अनुदानाचे हप्तेच मिळालेले नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या कुटुंबांना आता उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. या संदर्भात जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली असता काही लाभार्थींचे अनुदान तांत्रिक कारणामुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. तथापि, पहिल्या टप्प्याच्या अनुदानापासून ३००, दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासून २४०, तर तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासूनही २१० लाभार्थी वंचित आहेत. या सर्व लाभार्थीनी घरकु लाच्या कामासाठी आपले पूर्वीचे कुडामातीचे घर पाडले आणि अनेकांचे काम अर्ध्यावर आले. यासाठी त्यांनी कर्जही काढले; परंतु वर्षभराचा कालावधि उलटला तरी, त्यांना अनुदानाचे हपते नियमानुसार मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थींना नियमानुसार अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थींचे अनुदान प्रलंबित असले तरी, त्यांना ते मिळणार आहेच. घरकुलाच्या अनुदानापासून नियमानुसार वंचित कोणालाही ठेवता येत नाही; परंतु लाभार्थींनी घरकुलाचे काम नियमानुसार करणे आवश्यक आहे.    

-के. एम. अहमद प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, वाशिम