शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:27 PM

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.

अकोला: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रणासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली.ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ च्या एका सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये अल्प वयातच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर नियंत्रणासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १५ आॅगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, डॉ. एम. डी. राठोड यंची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण स्कूल, सावित्रीबाई फुले नर्सिंग स्कूल, आझाद हिंद नर्सिंग स्कूल, महात्मा फुले पॅरामेडिकल नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थिनींचा सहभाग होता. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामसभेत तंबाखू मुक्तीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रीती कोगदे, धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, आशीष शिंदे, राधिका जाधव, सय्यद आरीफ यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Akolaअकोला