शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेतून ‘डीपीसी’ सदस्यांसाठी १८ मार्चला मतदान

By admin | Updated: January 15, 2015 01:24 IST

निवडणूक कार्यक्रम जाहीर

अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) १५ जागांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी १८ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद मतदारसंघातून १५ सदस्यांची निवड करावयाची आहे; मात्र गतवर्षी लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या धावपळीत जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया रखडली. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी शिंदे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ह्यडीपीसीह्ण सदस्य पदांसाठी जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांची निवड करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. १८ फेब्रुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, २0 फेब्रुवारी रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर केली जाईल. नामनिर्देशनपत्र फेटाळल्या प्रकरणात २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल करता येईल. अपिलावरील अंतिम निर्णयाचा कालावधी २६ फेब्रुवारीपर्यंत असून, नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी २ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३ मार्च असून, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ४ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे. १८ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून, १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतमोजणी करण्यात येणार आहे.