शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 08:19 IST

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे. 

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, २६ एप्रिल रोजी अकोला मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात उत्साहात मतदान सुरू झाले. दुपारी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे बघावयास मिळत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे. 

यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजपाकडून खासदार पूत्र अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे अकोला मतदारसंघातून रिंगणात आहेत. अकोला शहर व जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ क्षेत्रातील २०५६ केंद्रांवर १८ लाख ९० हजार ८१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे. 

मतदारसंघात महिलांसाठी सात विशेष केंद्र असून, दिव्यांगांसाठी रेड कार्पेट अंथरलेले विशेष मतदान केंद्र साकारण्यात आले आहे. काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया प्रारंभ होण्यापूर्वीच मतदारांची गर्दी दिसून आली. सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :akola-pcअकोलाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४