शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या प्रसिद्ध; ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारले जाणार आक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 13:32 IST

अकोला : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमतदार याद्यांसंदर्भात ३१ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

अकोला : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांसंदर्भात ३१ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र नवीन मतदारांची नोंदणी, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करणे, मतदारांचे कृष्णधवल छायाचित्राऐवजी रंगीत छायाचित्र प्राप्त करणे, नावात व पत्त्यात दुरुस्ती इत्यादीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) व तहसील स्तरावरील मतदार मदत केंद्रांमार्फत मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादी पाहून आपल्या नावासंदर्भात खात्री करावी. तसेच काही त्रुटी व दुरुस्ती हवी असल्यास, त्यासंदर्भात संबंधित ‘बीएलओ’ व तहसील स्तरावरील मतदार मदत कक्षाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. मतदार नोंदणी विशेष मोहिमेत जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये दिव्यांग मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.जिल्ह्यात यापूर्वी १ हजार ५८५ मतदान केंद्र होते. त्यामध्ये ९५ मतदान केंद्र वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १ हजार ६८० झाली आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उप जिल्हाधिकारी (निवडणूक ) वैशाली देवकर, उप विभागीय अधिकारी संजय खडसे, नायब तहसीलदार सतीश काळे, श्रीकांत कोरकने उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय