शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

एका ‘टच’वर मतदारांची माहिती

By admin | Updated: October 6, 2014 01:36 IST

मतदार यादी तळहातावर मावणार्‍या स्मार्ट फोनवर पाहणे आता शक्य.

राम देशपांडे / अकोलासध्या सर्वच स्तरातून इंटरनेटचा वापर वाढलेला असून, टेक्नो सॅव्ही जगताकडे वाटचाल करणार्‍या शहरातील काही पक्ष उमेदवारांनी नोंदणी झालेल्या जुन्या-नव्या मतदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे कुठल्या मतदारसंघात आहेत, याची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल अँप्सचा वापर सुरू केला आहे. काही इंफोटेक कंपन्यांनी तयार केलेल्या अँप्सद्वारे निवडणूक प्रशासनाने तयार केलेली मतदार यादी तळहातावर मावणार्‍या स्मार्ट फोनवर पाहणे आता शक्य झाले आहे. शहरातील काही पक्ष उमेदवारांनी या मोबाईल अँप्सचा वापर सुरू केला आहे. इंटरनेटच्या सहाय्याने क्षणार्धात संपूर्ण राज्यातील विधानसभा मतदारांची यादी दिसत असल्यामुळे, उमेदवारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांंच्या मोबाईलवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कमीत कमी वेळेत व अचूक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या अँप्सचा उपयोग होत असल्याने, मतदारांना आकर्षित करण्यासाठीदेखील त्याचा उपयोग उमेदवारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मोबाईल अँप्सद्वारे नावानुसार, अडनावानुसार, घर क्रमांकानुसार, वयानुसार, कुटुंबानुसार, पत्त्यानुसार, भागानुसार, मतदान केंद्रानुसार, कार्यकर्त्यांंनुसार, जाती नुसार, संदर्भ व्यक्तीनुसार, बदललेल्या पत्त्यानुसार, व्यवसायानुसार, रक्तगटानुसार, जन्मतारखेनुसार व मृत म तदार अशा विविध प्रकारे माहिती उपलब्ध होऊ शकते. मोबाईल अँप्स वापरणार्‍या अधिकृत व्यक्तीलाच त्याचा पासवर्ड मिळत असल्याने त्यांची विश्‍वासार्हता अधिक बळावते.