शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 02:42 IST

आंबेडकर यांचे प्रतिपादन; दोन दिवसात घेतल्या १२ कॉर्नर सभा

अकोला, दि. १६-संविधान टिकविले तर आपण टिकणार आहोत, असे सांगत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत मतदान करा, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले.महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधील भारिप-बमसं उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील वाशिम रोडस्थित पंचशील नगरमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला हक्क मिळाले असून, आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे संविधान टिकविणे गरजेचे असून, संविधान टिकविले तर आपण टिकणार आहोत, त्यासाठी स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन अँड. आंबेडकर यांनी केले. निवडणुकीत केवळ जातीचा माणूस आहे, असा विचार न करता, काम करणार्‍या माणसाला जवळ करा, असे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ. डी.एम.भांडे, भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमिती प्रमुख बालमुकुंद भिरड, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठान, डॉ. प्रसन्नजित गवई, आसिफ खान, गजानन गवई, अमोल सिरसाट यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. अँड.आंबेडकरांनी गेल्या दोन दिवसात १२ कॉर्नर सभा घेतल्या हे विशेष !भाजप-संघावर टीकास्त्र!धार्मिक भावना भडकवून देशात सत्ता प्राप्त केल्यानंतर आज देशातील मुसलमानांना बाजूला ठेवले जात आहे, असे सांगत भाजप-संघ परिवारावर अँड. आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.