शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

खारपाणपट्ट्यातील गावे तहानलेली; शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:30 PM

अकोला: खारपाणपट्ट्यातील ६४ गावे तहानलेली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि.प. प्रशासनाने एक दिवसआड पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

अकोला: महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चक्क १८ ते २० दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी, खारपाणपट्ट्यातील ६४ गावे तहानलेली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि.प. प्रशासनाने एक दिवसआड पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आज रोजी महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. तरीसुद्धा संबंधित गावांना तब्बल १८ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. मागील २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेल्या सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाला अद्याप ही योजना सुरळीत करता आली नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सांगितले. पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना तीन-तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. सत्ताधारी भारिपने व जि.प. प्रशासनाने ६४ गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू न केल्यास शिवसेनेच्यावतीने सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी रोजी उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’ केला जाणार असल्याचा इशारा यावेळी नितीन देशमुख यांनी दिला. पत्रकार परिषदेला माजी आ. गजानन दाळू गुरुजी, मा. जिल्हाप्रमुख विजय मालोकार, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, शहर प्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, विकास पागृत, डॉ. विनीत हिंगणकर, प्रदीप गुरुखुद्दे, सहसंपर्क संघटिका ज्योत्स्ना चोरे, जिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने, देवश्री ठाकरे, रेखा राऊत, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, बळीराम कपले, नीलिमा तिजारे, शहर संघटिका राजेश्वरी शर्मा, वर्षा पिसोळे, सुनीता श्रीवास, शुभांगी किनगे, संगीता मराठे, सीमा मोकळकार, दिनेश सरोदे, अभिषेक खरसाडे, केदार खरे, अविनाश मोरे, तरुण बगेरे, अर्जुन गावंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.निवेदन देऊनही दखल नाही!खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी सातत्याने उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी लावून धरली आहे. याविषयी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ यांना अनेकदा निवेदन दिले. संबंधितांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्यामुळेच शिवसेनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर व नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना