शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या केबिनची तोडफोड

By admin | Updated: April 1, 2017 02:50 IST

पोलिसांना केले पाचारण; पाण्यासाठी महिला, नागरिकांचा मोर्चा.

हिवखेड(अकोला), दि. ३१- उन्हाळा लागत नाही, तोच येथील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून, या पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा चढविला. या मोर्चादरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड करण्यात आली.हिवरखेड या गावाची लोकसंख्या जवळपास ४0 हजार असून, गावाला वारी येथील वान धरणातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतकडून मात्र गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. गावातील व अनेक भागात ग्रामपंचायतकडून सोडलेले पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्यामुळे गावातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांंपूर्वी नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी २४ तास चालणारे पाण्याचे सार्वजनिक स्टँडपोस्ट दिले होते; मात्र काही दिवसांपूर्वी हे सार्वजनिक स्टँडपोस्टसुद्धा ग्रामपंचायतकडून बंद करण्यात आलेत. यामुळे नागरिकांना आणखीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ाची पाणी कर वसुलीदेखील सक्तीने मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.