शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावक-यांनी टाकली वरली मटक्यावर धाड

By admin | Updated: December 4, 2014 01:32 IST

दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत पुंडा येथे वरली मटक्यावर धाड.

आकोट ( अकोला) : पोलिसांऐवजी गावकर्‍यांनीच वरली मटक्यावर धाड टाकल्याची घटना दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या पुंडा येथे बुधवारी घडली. आकोट तालुक्यातील ग्रामीण भागात आकोट व दहीहांडा, अशी दोन पोलीस स्टेशन येतात. या पोलीस स्टेशनांतर्गत मोठय़ा प्रमाणात जुगार, दारू व ताजी वरली सुरू असल्याने ग्रामीण जनता वैतागली आहे. पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत असलेल्या पुंडा या गावात ३ डिसेंबर रोजी सुनील कुलट, बाबूराव कुलट व प्रदीप कदम यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी तलावाजवळ राजरोजपणे सुरू असलेल्या वरलीमटका अड्डय़ावर धाड टाकली. यावेळी वरलीमटका घेत असलेल्या पंजाब कोगदे नामक इसमाजवळून वरली चिठ्ठय़ासह इतर साहित्य जप्त केले. गावकर्‍यांनी धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून वरली मटका घेणारे पळून गेले. या प्रकरणी ग्रा.पं. सदस्य सुनील कुलट यांनी आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात वरलीमटका साहित्य जमा करून रीतसर तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थातुरमातुर कारवाई केल्यानंतर आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनाअतंर्गत जप्तीमधील साहित्य कमी दाखविल्या जात असल्याचीही ओरड आहे. आता थेट गावकरीच धाडी टाकत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.