शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीर जवानाच्या शोकात रात्रभर जागले ग्रामस्थ; वडिलांशी झाले होते शेवटचे बोलणे!

By सदानंद सिरसाट | Updated: July 7, 2024 15:16 IST

सदानंद सिरसाट, अकोला  : वीर जवान प्रवीण बाजीराव जंजाळ हे शहीद झाल्याची बातमी शनिवारी सायंकाळी गावात धडकताच  कुटुंबिय, नातेवाईक, ...

सदानंद सिरसाट, अकोला  : वीर जवान प्रवीण बाजीराव जंजाळ हे शहीद झाल्याची बातमी शनिवारी सायंकाळी गावात धडकताच  कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवारावर शोककळा पसरली. सर्वांनी आक्रोश करीत प्रवीणच्या आठवणींना उजाळा दिला. शनिवारची रात्र गावाने जागून काढली.

मोरगावातील वीर जवान प्रवीण जंजाळ हे शनिवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. परिसरातील दोन गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना  प्रवीण यांनाही मानेजवळ शत्रुची गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याबाबत ग्रामपंचायत सरपंच उमा माळी यांना सैन्यदलाकडून माहिती देण्यात आली. कुटुबियांमध्ये सर्वप्रथम त्यांचा मोठा भाऊ सचिन  जंजाळ यांनाही मेसेज देण्यात आला. यावेळी घरात असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीने आक्रोश केला. ते ऐकून वडील प्रभाकरराव यांनाही परिस्थितीचा अंदाज आला. कुटुंबातील सदस्यांसह जमलेल्या ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. लगतच्या बुद्धविहारात प्रत्येकाने धाव घेतली. प्रवीणच्या आठवणीचे हुंदके आणि त्यासोबत त्याने सैन्यात भरती होण्याची त्याची कशी महत्वाकांक्षा होती, यालाही उजाळा दिला जात होता.

वडिलांशी झाले शेवटचे बोलणे- प्रवीण यांनी शुक्रवारी सायंकाळी कुटुबियांशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांची आई शालूबाई घरी नव्हत्या. त्यामुळे वडील प्रभाकरराव त्यांच्याशी बोलले. घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी पैसे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.- भावाला शेवटचा मेसेजप्रवीण यांनी कुटुंबियांसाठी रक्कम पाठवल्याचा मेसेज मोठा भाऊ सचिन यांना पाठवला. तो त्याने उशिरा पाहिला. - रात्रभर जागले गावगावातील ग्रामस्थांनी रात्र  जागून रात्र काढली.

टॅग्स :Akolaअकोला