अकोला : महावितरणने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७0.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवून पुन्हा नवीन विक्रम नोंदविला आहे.५ ऑक्टोबरला ३६४.५७ दशलक्ष युनिट अशी विक्रमी वीज पुरविण्यात आली होती. वीज पुरवठय़ाचा हा विक्रम महावितरणने मंगळवारी ओलांडला. महावितरणने १७,२00 मेगावॉट वीज पुरवली असून, विजेची मागणी १७,५७३ मेगावॉट एवढी होती. १ ऑक्टोबरपासून महावितरण सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा जास्त विजेचा पुरवठा करीत आहे.
महावितरणचा वीजपुरवठय़ाचा विक्रम
By admin | Updated: October 17, 2014 01:06 IST