शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुरंबा येथे विजय भटकरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:05 IST

३00 विद्यार्थ्यांचा सहभाग मूर्तिजापूर :  मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध स्पर्धा आयोजित केले जाते.

ठळक मुद्देराष्ट्रीय विज्ञान स्पर्धा थाटात ३00 विद्यार्थ्यांचा सहभाग

मूर्तिजापूर :  मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध स्पर्धा आयोजित केले जाते. दयार्पूर येथील गाडगेबाबा मंडळाच्यावतीने विजय भटकर यांच्या वाढदिवशी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन, भटकर यांचा गौरव सोहळा व त्यांनी लिहिलेल्या संत गाडगेबाबा या इंग्रजी व मराठी भाषेत अनुवादित  ग्रंथांचा लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी थाटात पार पडले.मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान रुजावे, नवनवीन प्रयोग संशोधनाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या दृष्टींने ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात देशभरातील ३00 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच या निमित्ताने भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग बघायला मिळालेया सोहळ्याला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, हर्षवर्धन देशमुख, डॉ. आर.जे. राठोड, नितीन धांडे, दिलीप इंगोले, डॉ. अजय देशमुख, भागवत सैदाने, राहुल तायडे, चंदन राठोड, केशवराव मेतकर, नानासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच संत गाडगेबाबा यांच्या इंग्रजी व मराठीमध्ये अनुवाद केलेल्या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत जगावेगळे कर्तृत्व सिद्ध करणार्‍या डॉ. विजय भटकर यांनी विदर्भातील कौंडीण्यपूर येथे पंचकन्या विद्यापीठ नावाने देशातील सर्वात चांगले मुलींचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी डॉ. विजय भटकर यांचे आत्मचरित्र लिहिण्याची व प्रकाशन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष गजानन भारसाकळे व सदस्य रवींद्र खोटरे, प्रा. गजानन पदमने, मंदार देशमुख व शेखर पाटील यांचा समावेश असून, पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सदर आत्मचरित्र प्रकाशित करण्याचा मानस आहे. विदर्भस्तरीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाकरिता भरीव सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार यावेळी डॉ. विजय भटकर यांचे हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी रत्नमाला दूरशिक्षण संस्थेचे अमित भिमटे व दयाल  यांच्यासह आय.ए.एस. अँकॅडमीच्या विद्यार्थांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माने यांनी केले.