शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहावर विदर्भातील तज्ज्ञाचे परदेशात संशोधन !

By admin | Updated: July 24, 2015 00:58 IST

हर्षल देशमुख यांना इंग्लडच्या संस्थेद्वारे तीन कोटीचे अनुदान.

राजरत्न सिरसाट/अकोला : मधुमेह (डायबिटीस).. नावात गोडवा असला तरी, या आजाराने दरवर्षी लाखो जणांचे मृत्यू होत आहेत. विदर्भातील वाशिम जिल्हय़ातील डॉ. हर्षल अरुण देशमुख (रोहणेकर) या तरुण डॉ क्टरने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक ठरणार्‍या गुणसुत्र प्रणालीवर संशोधन हाती घेतले आहे. या संशोधनासाठी इंग्लंड येथील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेने त्यांना तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. येणारी सहा वर्षे ते यावर संशोधन करणार आहेत. मधुमेह हा आजार इतर देशांच्या तुलनेत भारतात झपाट्याने वाढला आहे. मधुमेह वाढीचा हा वेग कायम राहिल्यास २0३0 पर्यंत हा भारतात या आजाराचे ३६६ दशलक्ष रूग्ण राहतील. भारतातच नव्हे, तर आशिया खंडात मधुमेहाची त्सुनामीच आली आहे. डॉ. देशमुख यांनी या आजारावर अत्यंत मुलगामी संशोधन सुरू केले असून, या आजाराला प्रतिसाद देणार्‍या नवीन गुणसुत्र प्रणालीवर संशोधन त्यांनी हाती घेतले आहे. मधुमेहाच्या अनेक रुग्णांना इन्सुलीन, मेटफॉर्मिन दिले जाते; पण या औषधांचा परिणाम होत नसल्यास सल्फर युरियासारखे प्रयोग केले जात आहेत; पण या औषधाचाही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गुणसुत्र प्रणालीवर संशोधन हाती घेतले आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या ओघात पाश्‍चात्त्य खाद्याने भारतात प्रवेश केला आहे; पण वर्षानुवर्षे प्रोटीन, काबरेहायड्रेडची सवय असलेल्या भारतीयांच्या डीएनएला या पाश्‍चात्त्य खाद्याची सवय नसल्याने या आजारात भर पडत आहे. या आजारामुळे डोळे, किडनीवर परिणाम होतो. हा आजार नेमक ा कोणत्या अंतस्त्रावी ग्रंथीतील हारमोन्सचा अभावामुळे होतो, यावरही ते संशोधन करीत आहे. या संशोधनासाठी त्यांना तीन कोटी मिळाले असून, इंग्लंडमधील (युके) युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल अंतर्गत जेम्स कुक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ते संशोधन करणार आहेत. यासंदर्भात डॉ हर्षल देशमुख यांनी मधुमेहावर नेमके संशोधन करण्यासाठी युकेच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेचे तीन कोटी रूपये अनुदान मिळाले असल्याचे सांगीतले.