शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात समूहाने तुती लागवडीवर भर

By admin | Updated: August 13, 2015 22:36 IST

अमरावती विभागाला बाराशे हेक्टरचे उद्दिष्ट.

अकोला - तुती लागवड आणि त्या माध्यमातून रेशीम उद्योग उभारणीवर रेशमी संचालनालयाने भर दिला असून, त्यासाठी राज्यात समूहाने तुतीची लागवड केली जाणार आहे. यासाठी विदर्भाकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अमरावती विभागाला या लागवडीकरिता १२00 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तुती लागवडीतून शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. तुतीच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला चालना मिळत आहे. म्हणूनच राज्यात तुतीच्या क्षेत्रात वाढ होत असून, यासाठी शेतकरी बचत गट पुढे येत आहेत. पाणीटंचाईच्या संकटात तुती लागवड सोयीस्कर असल्याने शेतकर्‍यांचा कल तुती लागवडीकडे आहे. या हंगामात राज्यात जवळपास ६0 हजार हेक्टरपर्यंत तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये ४८0 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. अमरावती विभागाला १२00 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात ७७ हेक्टर, वाशिम १0६, बुलडाणा ४६ हेक्टर, यवतमाळ ९६ हेक्टर व अमरावती जिल्ह्यात ४0 हेक्टरवर तुती लागवड करण्यात आली आहे. यंदा रेशीम विकास अधिकार्‍यांनी तुती लागवड करण्यासाठी आवाहन केले आहे; पण रेशीम संचालनालयाने यापुढे तुतीची लागवड समुहाने करण्यावर भर दिला आहे. एका शेतकर्‍याने तुती लागवड केल्यास त्या शेतकर्‍याला लागवडीची तांत्रिक माहिती देण्यास अडचण निर्माण होत असल्याने समूहाने लागवड करण्यावर यंदा भर दिला जात आहे. अकोला जिल्ह्यात पाचही तालुक्यात तुती लागवडीसाठी शेतकर्‍यांचे समूह (कल्स्टर) करण्यात आले आहेत, यात तेल्हारा, आकोट, मूर्तिजापूर, बाळापूर व उर्वरित तीन तालुक्यांचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले आहेत.

            अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला बचत गटाद्वारे रेशीम काढण्यासाठीचे उद्योग सुरू करण्यात आले आहे. राज्यात यंदा समूहाने तुती लागवड क्षेत्र वाढीवर भर देण्यात आला आहे. तुती लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, हा उद्देश या मागे आहे. जिल्ह्यात २४0 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७७ हेक्टरवर तुती लागवड करण्यात आली असल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस.पी. फडके यांनी सांगीतले.