शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

video- ‘माणुसकीच्या भिंती’ने खुलविले वंचितांच्या चेह-यावर हास्य!

By admin | Updated: October 26, 2016 12:56 IST

दिवाळ सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे म्हटले जाते. घरदार, आर्थिक परिस्थिती ब-यापैकी असलेले हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.

ऑनलाइन लोकमत 

अकोला, दि. २६ -  दिवाळ सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे म्हटले जाते. घरदार, आर्थिक परिस्थिती ब-यापैकी असलेले हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. निराधार, गोर-गरीब, भटके जीवन जगणा-यांच्या नशिबी मात्र हा आनंद नसतो. या वंचितांना अंगभर कपडे मिळावे व त्यांची दिवाळी आनंदात जावी, या उद्देशाने ‘भारत एक कदम’ या सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या ‘माणुसकीची भिंत’या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे वंचितांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे.
 
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंतीची निवड करण्यात आली आहे. ही भिंत सुशोभित करण्यात आली असून, येथे सुस्थितीत असलेले जुने कपडे, मुलांची खेळणी, चपला, चादर, ब्लँकेट अशा विविध वस्तु आणून ठेवाव्यात, असा हा उपक्रम आहे. माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशुरांनी मदतीचे हात पुढे केले. 
 
गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून दररोज शहरातील नागरिक या माणुसकीच्या भिंतीवर मोठ्या संख्येने कपडे आणून ठेवत आहेत. गोर-गरीब व निराधार लोकांसाठी हा उपक्रम आनंद देणारा ठरत आहे. दिवसभर या भिंतीवर ठेवलेले कपडे व इतर वस्तु नेण्यासाठी गर्दी होत आहे. दिवाळीपूर्वी जुनेच का होईना; परंतु अंगभर कपडे मिळाल्याचा आनंद या वंचितांच्या चेहºयावर दिसून येत आहे.