शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- 'अमर रहे'च्या जयघोषात शहिदांना अखेरचा निरोप

By admin | Updated: February 1, 2017 16:38 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 1 - काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद जवान आनंद गवई व संजय खंडारे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 1 - काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद जवान आनंद गवई व संजय खंडारे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे-अमर रहे शहीद जवान अमर रहे, भारत माता की जयच्या घोषात शहिदांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.काश्मीरमधील हिमस्खलनात अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशीलनगरमधील आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे यांना २५ जानेवारी रोजी वीरमरण आले. १३ महार रेजिमेंटचे जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाल्याने, जिल्ह्यात शोककळा पसरली. दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव गत सोमवारी श्रीनगरमध्ये पोहोचले. शवविच्छेदनानंतर श्रीनगर येथून विमानाने शहीद जवानांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीत आणण्यात आले. दिल्ली येथून विमानाने त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री ८.३० वाजता नागपूर येथे आणण्यात आले. नागपूर येथून लष्कराच्या वाहनाने शहीद जवानांचे पार्थिव रात्री २ वाजता अकोल्यात आणण्यात आले. बुधवारी सकाळी अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशिल नगरमधून शहीद आनंद गवई यांची अंंत्ययात्रा काढण्यात आली. गीता नगरस्थित स्मशानभूमीत आनंद यांच्यावर तर माना येथे संजय खंडोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहिदांचे कुटुुंबीय, राजकीय नेते, विविध शासकीय संघटना, सैनिक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

https://www.dailymotion.com/video/x844q91