शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आकोटात साजरा झाला झेंडवाई उत्सव

By admin | Updated: November 2, 2016 14:58 IST

आकोट शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून झेंडवाई उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव गुरांच्या पूजनासाठी ओळखला जातो.

ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. २ -  आकोट शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून झेंडवाई उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव गुरांच्या पूजनासाठी ओळखला जातो. झेंडवाई हा सण पारंपारिक शेती संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे. या उत्सवातील झेंडवाई ही झेंडूची फुले व गवतापासून बनविलेली असते. गोठाणावर त्याची गवळणींच्या हस्ते पूजा करण्यात येते. त्यानंतर गाय गुरांख्यांवर आधारीत असलेली लोकगीते आळवीत, वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक परिसरातील पशुपालकांच्या दारावर जाते. झेंडवाईतील गुराखी हे गोधनाची श्रीमंती, आरोग्य व पुराणातील असलेल्या त्यांच्या संबंधावरील लोकगिते सादर करतात. यावेळी वर्षभर सेवा करणा-या या गुराख्यांना धान्य, कपडे व बिदागी पशुपालक देतात. 
 अनेक गावाांमधून झपाट्याने लुप्त होणारा हा उत्सव सध्या आकोट शहरातील मोठे बारगण, रामटेकपूरा या भागात वर्षानुवर्षे साजरा होतो. दिवसेंदिवस घटणारे गोधन व गुराख्यांमुळे हा उत्सव आता हळूहळू लोप पावत चालला आहे. लोप पावत चाललेल्या अशा अनेक  प्रथा - परंपरा कायम राहाव्यात या हेतूने भूमि फाउंडेशनने पारंपारिक व पुरातन झेंडवाई उत्सव साजरा करणा-या  गुराख्यांचा सत्कार केला.  
 
 स्थानिक पानअटाई येथे भूमी फाउंडेशनच्या वतीने गुराख्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या झेंडवाईतील पारंपारिक लोकगितांच्या मधुर स्वरांनी  वातावरण भारावून गेले होते.  या गुराखी सन्मान सोहळ्यात पारंपारिक झेंडवाई या उत्सवाचे जतन करणारे वयोवृध्द रामकृष्ण तेलगोटे व त्यांचे सहकारी किसन तेलगोटे, कैलास अंभोरे, संजय पळसपगार, ज्ञानेश्वर अढाऊ, पंजाब पाचपोहे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ, सचिव चंचल पितांबरवाले, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा.श्रीकृष्ण काकडे, पंकज अंबुलकर, पत्रकार संतोष विणके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला बहुसंख्य पशुपालक, गुराखी व नागरिकांची उपस्थिती होती.