शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ बोरगावमंजू बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 13:12 IST

बोरगाव मंजु येथे पालिसांनी नवदुर्गा विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्त्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १३ - बोरगाव मंजु येथे पालिसांनी नवदुर्गा विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्त्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. 
 गुरूवारी रात्री येथे सुरू  असलेल्या विसर्जन मिरवणुकीत  पोलिसांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून तणाव निर्माण झाला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पालिसांनी अकोला येथुन रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी मिरवणुकीच्या स्थळी येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला यामध्ये  बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल हे तिन युवक जखमी झाले.  पोलिसांनी कुठलाही विचार न करता बळाचा वापर केला. मिरवणूकीदरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. सर्व समाजातील नागरीक उत्साहाने सहभागी होते मात्र पोलिसांनी एका कार्यकर्त्याला नाहक मारहाण केल्याचे पडसाद मिरवणुकीत उमटल्याने रात्री १२ :३० पर्यंत मिरवणुक बंद होती.  रात्री उशीरा पर्यंत तणाव निवळण्यात यश आले व मिरवुणक पार पडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांंच्या दडपशाहीचा निषेध करीत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सर्व प्रकारात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी बोरगाव मंजूमध्ये दाखल होताच सुरू केलेल्या मारहाणीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी संपूर्ण गावातील दुकाने बंद ठेवली, सकाळी दहा वाजता मुक मोर्चा काढला. हा मोर्चा सोपिनाथ महाराजांच्या मंदिरावर गेल्यावर तिथे सभेत रुपांतर होऊन सर्वांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली.  रात्री उशीरापर्यंत आमदार रणधीर सावरकर बोरगावमंजूमध्ये ठाण मांडून होते त्यामुळे गावातील तणाव निवळण्यास मदत झाली.