शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

VIDEO- एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर !

By admin | Updated: September 25, 2016 15:52 IST

नागरिकांना २४ तास पैसे काढण्याची सोय म्हणून शहरात सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एटीएम उभारले

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - नागरिकांना २४ तास पैसे काढण्याची सोय म्हणून शहरात सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एटीएम उभारले आहेत. शहरातील जवळपास सर्वच एटीएमला कोणतीच सुरक्षा नसल्याने या एटीएम मशिन रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या काचा, बंद पडलेली वातानुकूलन यंत्रणा, सुरक्षारक्षकांचा अभाव यामुळे एटीएमची सुरक्षा धोक्यात आहे. एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी ठरावीक वेळा व्यवहार केल्यानंतर पुढील व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाते. ज्या अर्थी या बँकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाते, त्याअर्थी बँकेने सुसज्ज एटीएम सेंटर उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा बंद पडलेली असते. एटीएममध्ये जाण्यासही काही महिला धजावत नाहीत. अशा सेंटरवर पुरेपूर सुरक्षायंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच अनेक एटीएम सेंटरमध्ये आगप्रतिबंधात्मक यंत्रणाही नाही. आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची सूचना देणारा भोंगा नसतो. या सर्व समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. एटीएम सेंटरवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांकडे सुरक्षेची साधने अतिशय तोकडी असतात. अनेक जणांकडे लाठीसुद्धा नसते. त्यामुळे समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास या सुरक्षारक्षकांकडून काहीच प्रतिकार होणार नाही. बचावासाठी त्यांच्याकडे साधन नसल्यास त्यांना गंभीर इजा अथवा जीव गमवावा लागेल. त्यामुळे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तैनात असणे आवश्यक असते.स्वयंचलित दरवाजे नाहीतएटीएमचे दरवाजे आधुनिक यंत्रणेनुसार व्यक्ती आत गेल्यानंतर बंद होणे व व्यवहार केल्यानंतर उघडणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील एकाही एटीएम सेंटरवर ही यंत्रणा सुरू नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर अनेक वेळा दुसरी व्यक्ती दरवाजाच्या आत येऊन थांबलेली असते. अनेक एटीमएची दारे सताड उघडी असतात. एकाच वेळी दोन ते तीन व्यक्ती आतमध्ये घुसतात. यामुळे पैसे काढणाऱ्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.